सायबर सुरक्षा

डिजिटल अरेस्ट स्कॅम: हा कॉल तुम्हालाही येऊ शकतो

ओळखा, वाचा आणि तक्रार करा: 7 स्लाइडमध्ये संपूर्ण माहिती

1 / 7

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

गुन्हेगार स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टम्स अधिकारी असल्याचे भासवतात. ‘तुमच्यावर गुन्हा दाखल आहे’ असे सांगून व्हिडिओ कॉलवर तासन्तास ‘अटकेत’ ठेवतात आणि पैसे उकळतात.

2 / 7

कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नाहीच

रिझर्व्ह बँक आणि गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे: कोणतीही तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही, चौकशी करत नाही आणि पैसे मागत नाही.

3 / 7

आकडे धक्कादायक

2024 मध्ये डिजिटल अरेस्टच्या 1,23,672 तक्रारी आणि सुमारे ₹1,935 कोटींचे नुकसान झाले.

स्रोत: सर्वोच्च न्यायालयात सादर झालेली I4C आकडेवारी

4 / 7

धोक्याची चिन्हे

• व्हिडिओ कॉलवर ‘चौकशी’ किंवा ‘अटक’
• कुटुंबाला सांगू नका अशी धमकी
• ‘सुरक्षित सरकारी खात्यात’ पैसे पाठवा
• व्हॉट्सअॅपवर वॉरंट किंवा FIR ची PDF
• OTP, आधार, बँक तपशीलाची मागणी

5 / 7

असा कॉल आला तर

• घाबरू नका, कॉल लगेच कट करा
• कुटुंबातील कोणालातरी लगेच सांगा
• यंत्रणेच्या अधिकृत नंबरवर स्वतः पडताळणी करा
• नंबरची तक्रार संचार साथीवरील ‘चक्षू’ सुविधेवर करा

6 / 7

पैसे गेले? लगेच 1930

राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करा आणि cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. तक्रार जितकी लवकर, तितकी पैसे गोठवले जाण्याची शक्यता जास्त.

7 / 7

ही माहिती शेअर करा

घरातील ज्येष्ठांना हा स्कॅम आवर्जून समजावून सांगा. तक्रारीची संपूर्ण प्रक्रिया आणि FAQ खालील लेखात वाचा.