ओळखा, वाचा आणि तक्रार करा: 7 स्लाइडमध्ये संपूर्ण माहिती
1 / 7
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
गुन्हेगार स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टम्स अधिकारी असल्याचे भासवतात. ‘तुमच्यावर गुन्हा दाखल आहे’ असे सांगून व्हिडिओ कॉलवर तासन्तास ‘अटकेत’ ठेवतात आणि पैसे उकळतात.
2 / 7
कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नाहीच
रिझर्व्ह बँक आणि गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे: कोणतीही तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही, चौकशी करत नाही आणि पैसे मागत नाही.
3 / 7
आकडे धक्कादायक
2024 मध्ये डिजिटल अरेस्टच्या 1,23,672 तक्रारी आणि सुमारे ₹1,935 कोटींचे नुकसान झाले.
स्रोत: सर्वोच्च न्यायालयात सादर झालेली I4C आकडेवारी
4 / 7
धोक्याची चिन्हे
• व्हिडिओ कॉलवर ‘चौकशी’ किंवा ‘अटक’ • कुटुंबाला सांगू नका अशी धमकी • ‘सुरक्षित सरकारी खात्यात’ पैसे पाठवा • व्हॉट्सअॅपवर वॉरंट किंवा FIR ची PDF • OTP, आधार, बँक तपशीलाची मागणी